दिल्लीत हवेची गुणवत्ता आणखी खालावली

नवी दिल्ली – दिल्लीतील हवेचे प्रदुषण अजून कमी होण्याचे नाव घेईना त्यामुळे हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. आज सकाळच्या नोंदीनुसार दिल्लीचा हवा प्रदुषण अतिधोकादायक म्हणून गणले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे येथील लोकांसाठी  श्वास घेणं ही कठीण झालं आहे. तसेच दिल्ली पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत चालवण्यात येणाऱ्या होप ऑन होप ऑफच्या सेवेचा वापर करणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे.

तत्पूर्वी, दिल्लीतील सर्व महत्वाच्या स्थळांना सीआयएसएफच्या जवानांचे संरक्षण आहे. हजारो जवान तेथे तैनात आहेत त्यात प्रामुख्याने नॉर्थ व साऊथ ब्लॉक, लाल किल्ला, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध मंत्रालये इत्यादी ठिकाणी या संस्थेचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या खराब हवेचा दुष्परिणाम या जवानांवर होऊ नये यासाठी एन 95 दर्जाचे तोंडाला बांधण्याचे मास्क जवानांना देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.