लाहोर : पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या झमान पार्क या निवासस्थानाच्या तपासणीसाठी पंजाब पोलिसांना “सर्च वॉरंट’ मिलाले आहे.
लाहोर शहर पोलीस दलाचे प्रमुख बिलाल सादिक कामयाना यांनी ही माहिती दिली. झमान पार्कमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणखीन 6 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे झमान पार्कमधील अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या 14 इतकी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अस्करी टॉवरवरील हल्ल्यात चार कथित दहशतवादी सामील होते तर कॉर्प्स कमांडर हाऊसची तोडफोड करणाऱ्यांपैकी दोन जण होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
झमान पार्कच्या तपासणीसाठी “सर्च वॉरंट’ मिळाले असले तरी घरात घुसण्यापूर्वी इम्रान खान यांच्याशी चर्चेसाठी एक पथक पाठवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यानुसार लाहोरचे आयुक्त मोहंम्मद अली रंधवा यांच्या नेतृत्वाखालील हे पथक आज संध्याकाळी इम्रान यांची भेट घेण्याची शक्यता आहे.