नेवासा – कुकाणा – गेवराई रस्त्यावर दुचाकी अॅक्टिव्हा स्कुटी (क्रमांक एम.एच.२० एफ.एस.६११२) ही रस्ता दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर पाच वर्षाची चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाली आहे
बुधवारी (दि.२८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गंगाधर दत्तू बारगळ रा.खुलताबाद (जि.औरंगाबाद) हे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हाताला या अपघातात गंभीर जखम झाली आहे.
अपघाताची खबर मिळताच कुकाणा दुरक्षेञाचे पोलीस हवालदार पी. एम. खेडकर यांनी अपघातस्थळी मदत करुन जखमी मुलीला पुढिल उपचारार्थ खासगी दवाखाण्यात हलविण्यास मदत केली. नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे