राफेल : सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांचं मतदान झालं तरी राफेलचा मुद्दा अजूनही सुरूच आहे.
राफेल करारावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरून न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 4 मे पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच 6 मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

त्यापूर्वी राफेल विक्री कराराबाबत माहिती प्रतिज्ञापत्र सादर करण्यास चार आठवड्यांची मुदत द्यावी, अशी मागणी भारताचे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती मान्य केली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.