“फणी’ चक्रिवादळ लवकरच ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ हे चक्रिवादळ  मंगळवारी “अति तीव्र’ बनू शकते, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ‘फणी’ हे चक्रिवादळ ३ मे पर्यंत ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गोपाळपूर आणि चंदबाली दरम्यान, पुरीच्या दक्षिणेकडील भागात धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. या भागात ताशी १७५-१८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग वाढत जाऊन ताशी २०५ किलोमीटर होण्याचा संभव असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हंटले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कमिटीने या इशाऱ्याची तातडीने दखल घेतली असून “फणी’मुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या व्यवस्थापनासाठी आज बैठक घेतली. या चक्रिवादळाचा फटका बसू शकणाऱ्या सर्व संबंधित राज्यांनाही हा इशारा देण्यात आला आहे.

“एनडीआरएफ’ आणि “कोस्टगार्ड’लाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रिवादळामुळे समुद्र खवळलेला असणार असल्याने मच्छिमारांनीही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यावर गुरुवारी मुसळधार पावसाचीही शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.