“उध्दवा अजब तुझे सरकार” म्हणत भाजप नेत्याने घेतला ठाकरे सरकारचा समाचार

मुंबई – रिअल इस्टेट क्षेत्रावरील प्रीमियम 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे विकसकाबरोबरच केंद्र सरकारने कौतुक केले आहे. मात्र या निर्णयावर  भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली.

नेमकं काय म्हणाले केशव उपाध्ये

“इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा कंत्राटदांराना मणीहार उध्दवा अजब तुझ सरकार कारण मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देत कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत खोट्या बिलांचे पैसे दिले जातात पण मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही.” मुंबईतील स्थानिक लोकांना मालमत्ताकरात सवलत दिली जात नाही, मात्र रिअल इस्टेट क्षेत्रावरील व्यावसायिकांना मात्र सर्व फायदे दिले जातात. असे निर्णय घेणारं ठाकरे सरकार ‘अजब’ आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.