नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज नेहमीच मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. त्यामुळे अनेक वेळा मोदी सर्मथकांकडून त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येते. सोशल साईटवर मात्र ते ट्रोल करणाऱ्या मोदी समर्थकांकडे दुर्लक्ष करीत मोदींविरुद्ध आवाज उठवत राहतात.
Dear BHAKT”s …
I am questioning who is in POWER
You are asking me to question who is NOT IN POWER
we are not the same #justasking— Prakash Raj (@prakashraaj) June 3, 2021
मात्र, यावेळी त्यांनी अगदी प्रेमळ शब्दात मोदी समर्थकांना उत्तर दिल आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेल्या काळात गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी अनेक सोशलवर मीडिया युजर्सने ट्विट केलं आहे. कठुआ मंदिरातील गँगरेप आणि गाझियाबाद येथील मशिदीतील बलात्कार या दोन्ही समान घटना आहेत. अशी चर्चाही सोशलवर सुरु आहे. या घटनेतील आरोपीना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सोशलवर केली जात आहे. मात्र काही युजर्स आरोपीच्या समर्थनार्थ असून ते मोर्चे काढत आहे.
या समर्थकांना अभिनेत्री स्वरा भास्कर हिने JustAsking हा हॅशटॅगही वापरत भारत माती की जय म्हणणारे त्यांविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल केला. यावर आता तिच्या ट्विटला रिट्विट करत पाठिंबा दिला. यावर त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले. मात्र यावेळी प्रकाश प्रकाश राज यांनी उत्तर दिलंय.
नेमकं काय म्हणाले प्रकाश राज
‘प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारत आहे, जे आज सत्तेत आहेत. मी सत्ते नाही… असे ट्विट राज यांनी केल.’