सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनचा हा १५० वा कसोटी सामना होता.
James Anderson is back in the England line-up and he has already reached a milestone!
Talk about prolific 👀#SAvENG pic.twitter.com/VdY1iv2bO1
— ICC (@ICC) December 26, 2019
यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणा-या खेळाडूंच्या यादीत अँडरसन हा ९ व्या स्थानी पोहचला आहे. त्याच्याआधी इंग्लंडकडून एलिस्टर कूकने (१६१) ही कामगिरी आहे. त्याच्याशिवाय या यादीत सचिन तेंडूलकर (२००), स्टीव वाॅ(१६८), रिकी पाॅटिंग (१६८), जॅक कॅलिस (१६६), शिवनारायण चंद्रपाल (१६४), राहुल द्रविड (१६४), एलिस्टर कूक (१६१), एॅलन बोर्डर (१५६) यांचा समावेश आहे.
AND HE GETS A WICKET ON THE FIRST BALL!
South Africa are 0/1 at Centurion.#SAvENG https://t.co/XwOefuG4aF
— ICC (@ICC) December 26, 2019
अँडरसनने या सामन्यात आणखी एक विक्रम केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डिन एल्गरला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये हे नवव्यांदा अस घडलय जेव्हा फलंदाज पहिल्याच चेंडूवर तबूंत परतला आहे. आफ्रिकेच्या एल्गर पूर्वी इंग्लंडचे हर्बर्ट सटक्लिफ आणि स्टैन वर्थिंगटन, आफ्रिकेचा जिमी कूक, बांगालादेशचा हनान सरकार, भारताचा वसीम जाफर आणि केएल राहुल , न्यूझीलंडचा मॅकिनटोश हे फलंदाज कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.
हनान सरकार दोन वेळेस कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे आणि योगायोग म्हणजे दोन्ही वेळेस त्याला बाद करणारा गोलंदाज म्हणून वेस्टइंडिजचा खेळाडू पेड्रो कोलिन्स हाच होता.