सेंच्युरियन : क्विंटन डी काॅकच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान द.आफ्रिकेने चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडविरूध्द पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ८२.४ षटकांत ९ बाद २७७ धावा केल्या आहेत. कगिसो रबाडा बाद झाल्यानंतर पहिल्या दिवसांचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा वरनाॅन फिलेंडर २८ धावांवर खेळत होता.
Stumps – day 1 | SA: 277-9
An exciting day of test cricket.
All three sessions had a shift in momentum with each team trying to make their mark on this match.
Two players shone above the rest today.
🏏 de Kock – 95(128)
🏏 Curran – 4/57 #ProteaFire #SAvENG pic.twitter.com/FfyyyTtHkw
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 26, 2019
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाही. जेम्स अँडरसनने बटलरकरवी डीन एल्गर पहिल्याच चेंडूवर बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर ठराविक धावांच्या अंतरावर आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. आफ्रिकेकडून क्विंटन डी काॅकने एक बाजू सावरत १२८ चेंडूत १४ चौकारसह ९५ धावांची खेळी केली.
OUT!!
De Kock falls for 95 – @CurranSM has his fourth wicket.
Follow LIVE:https://t.co/fgnXNDOHxn pic.twitter.com/OJ8Qc4hPct
— England Cricket (@englandcricket) December 26, 2019
डी काॅक शिवाय जुबैर हमजा ३९, ड्वेन प्रीटोरियस ३३, फाफ डू प्लेसी २९,वरनाॅन फिलेंडर नाबाद २८ आणि एडेन मार्करमने २० धावांची छोटी खेळी करत संघाच्या धावसंख्येस हातभार लावला.
Sam Curran has his second four-wicket haul in Test cricket 👌
Will he get his first five-for today? #SAvENG pic.twitter.com/N1gADmfbHa
— ICC (@ICC) December 26, 2019
इंग्लंडकडून सॅम करन याने ५७ धावा देत ४ तर स्टुअर्ट ब्राॅडने ५२ धावा देत ३ गडी बाद केले. जेम्स अँडरसन आणि जोर्फा आर्चर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.