काही करून आम्हाला वाचवा… विद्यार्थ्यांचा टाहो

अन्न पाणी संपत आल्याने भारतीय विद्यार्थ्यांचा चीनमध्ये मदतीसाठी सरकारकडे धावा
वुहान : आम्हाला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, आम्हाला वाचवा, येथून काहीही करून हलवा, अन्यथा अन्नासाठी बाहेर पाडावे लागेल,त्यात काय होईल ते सांगता येत नाही अशी आर्त हाक येथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारत सरकारला घातली आहे.

कोरोना व्हायरसने अख्ख्याला धोका निर्माण केला आहे. या जंतु संसर्ग जेथून सुरू झाला त्या वुहान भागाचा संपर्क जगापासून तोडण्यात आला आहे. त्यामुळे येथील दुकाने संस्था बंद आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांनी भारत सरकारला साकडे घातले आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आम्हाला आमच्या वस्तीगृहात राहण्यास सांणगण्यात आले आहे. येथे जिवनावश्‍यक वस्तूच्या खरेदीसाठी दोन तासांची मुदत दिली जाते. मात्र दुकाने बंदच असल्याने काहीही मिळत नाही. येथे अन्न धान्याचा तुटवडा आहे. त्यामुळे अन्न पाण्यासाठी वणवण करावी लागेल, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.

वुहान विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा हा 22 वर्षीय युवक म्हणाला, चीनमधील भारतीय दुतावास आमच्या सातत्याने संपर्कात आहे. भारत सरकारने आम्हाला लवकरात लवकर येथून हलवावे, असे आवाहन मुळच्या आसाममधील या विद्यार्थ्याने केले आहे.

आसाम, दिल्ली, महाराष्ट्र, प. बंगाल आणि जम्मू काश्‍मिरमधील विद्यार्थ्यांचा 58 जणांचा गट या विद्यापीठात शिकत आहे. या 58 जणांत 47 पुरूष आणि 11 महिला आहेत. आम्हाला बाहेर जाण्यास परवानगी नाही. आमचा तपशील आम्ही भारतीय दुतावासाला कळवला आहे. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे हा प्रशिक्षणार्थी म्हणाला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.