शिक्षक भरतीची माहितीच अधिकाऱ्यांकडून सादर होईना

पुणे – पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही त्यांचे पालन होत नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे आता माहिती सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना 4 ते 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी जारी केले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेच्या शाळांमधील 5 हजार 822 शिक्षण सेवक पदांची शिफारस पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आली होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी शाळांमधील शिफारसपात्र उमेदवारांच्या आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी, नियुक्‍तीसाठी पात्र व अपात्र उमेदवार, पात्र शिक्षकांचे नियुक्‍ती आदेश व रुजू अहवाल याबाबत उमेदवारनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांना अनेकदा बजाविण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनही व राज्यस्तरीय सभेमध्ये सूचना देऊनही परिपूर्ण माहितीच सादर करण्यात आली नाही.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांसाठी फतवा काढला आहे. माहिती सादर करण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रकच निश्‍चित करून दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.