माझ्या आई बाबांसाठी तरी सोडा

निर्भया प्रकरणातील नराधम शर्माचा फाशी टाळण्यासाठी विनय

नवी दिल्ली : मला जगण्याची खरंच इच्छा नाही. मात्र माझे पालक मला सांगतात की, ते माझ्याकडे पाहून जगत आहेत, त्यांना मी कारागृहात जाऊन जखम दिली आहे, अशी भावनिक विनवणी निर्भया सामुहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेल्या दयेच्या याचिकेत ही विनवणी करण्यात आली आहे. अक्षय ठाकूर या अन्य एका फाशी ठोठावलेल्या आरोपीने दाखल केलेल्या दुरूस्ती याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार आहे. न्या. एन. व्ही रमणा, अरूण मिश्रा, रोहिंटन फली नरीम, आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दयेची याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला मुकेश सिंग याने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायलयाने बुधवारी फेटाळली होती. विनय शर्मा याची याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे प्रलंबित असल्याने दि. एक फेब्रुवारीला या नराधमांना फाशी मिळण्याची शक्‍यता दुरावली आहे. कारण कारागृहाच्या नियमानुसार राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज प्रलंबित असेल तर फाशी देता येत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.