सातारा -विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हेच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह तडीपार संशयिताला सापळा रचून अटक केली. शुक्रवार (दि.8 ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
तडीपार असलेला अमित हणमंत कदम (रा. अंतवडी,ता. कराड), सराईत अल्तमेश ऊर्फ मोन्या हारून तांबोळी (रा. मंगळवार पेठ,कराड) यांना शिरवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत शहापूर ते तासवडे टोलनाका जाणाऱ्या रस्त्यावर अटक करण्यात आली.
अधिक माहिती अशी, शुक्रवारी (दि. 8) दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ शिरवडे परिसरात गस्त घालत होते. दरम्यान समोरून आलेले दोन तरूण पोलिसांना पाहून पळून गेले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिरवडे ते तासवडे टोलनाका जाणाऱ्या रस्त्यावर पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीची एक लाख 50 हजार रूपये किंमतीची दोन पिस्टल आढळली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी करून पुढील कारवाईसाठी तळबीड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार अतिष दबडे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले,
नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रवीण कांबळे, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रवीण पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत यांनी ही कारवाई केली.