सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (शनिवार, दि. 2) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 61 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला असून साताऱ्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 55 हजारांच्या पार गेला आहे, तर “रिकव्हरी रेट’ 94 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान कायम आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात चिमणपुरा पेठ चार, शाहूनगर दोन, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, सदरबझार प्रत्येकी एक, इतरत्र दोन, शाहूपुरी, पिरवाडी प्रत्येकी तीन, नागठाणे, वडूथ, पाटखळ, देगाव, सोनगाव, अपशिंगे, अतीत, नुने प्रत्येकी एक,
कराड तालुक्यात चरेगाव, शिरवडे प्रत्येकी दोन, कराड शहर , हणबरवाडी, कृष्णा मेडिकल कॉलेज प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात फलटण शहर, जिंती प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव दोन, वाघोली, जळगाव प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ, बामणोली प्रत्येकी एक,
खटाव तालुक्यात तडवळे, औंध प्रत्येकी एक, माण तालुक्यात मार्डी पाच, दहिवडी, म्हसवड प्रत्येकी दोन, जांभुळणी, धामणी, बोथे प्रत्येकी एक, वाई तालुक्यात राऊतवाडी दोन, धावडी, चिंधवली, परतवडी प्रत्येकी एक, दरम्यान, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आयटीआय रोड (सातारा) येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबळींची एकूण संख्या 1794 झाली असून 52 हजार 80 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.