Satara news : लष्कर जवानाची आत्महत्या

कवठे  -कुसगाव, ता. वाई येथील लष्करी जवान अभिजीत कृष्णदेव वरे (वय 32) यांनी गुरुवारी (दि. 23) रात्री घरातील तुळईला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आसाममध्ये रायपूर येथे त्यांची नुकतीच नेमणूक झाली होती. 

ते तीन महिन्यांपासून रजेवर होते. अभिजीत हे पत्नी, मुले, आई आणि भावासमवेत कुसगावमध्ये एकत्र राहत होते. घरातील सर्व जण जेवण करून झोपल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. अभिजीत यांचे चुलते संजय रामचंद्र वरे यांनी याबाबतची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली. सहाय्यक फौजदार आर. झेड. कोळी, पोलीस नाईक वैशाली चव्हाण, शमा माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अभिजीत हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.