बाळासाहेब पाटील यांची प्रांजळ कबुली; बहुतांश निधी आरोग्य विभागाकडे वर्ग
वडूज – करोनामुळे शासनाचा बहुतांश निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे दोन लाखापर्यंतची थकबाकी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देता आले नाही, अशी प्रांजळ कबुली सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
वडूज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची नूतन इमारत व व्यापारी संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन खाडे, इंदिरा घार्गे, नंदकुमार मोरे, जितेंद्र पवार, सी. एम. पाटील, प्रा. बंडा गोडसे, अशोक गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, सहाय्यक निबंधक सौ. विजया बाबर, शशिकला देशमुख, श्रीमंत पाटील, तुकाराम यादव, डी. एन. पाटील, अंकुश दबडे, अभय देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल यलमर, उपाध्यक्ष गोविंद काळे,
संचालक वामनराव गोडसे, मानसिंग गोडसे, हरिश्चंद्र काळे, प्रमोद गोडसे, डी. के. गोडसे, चंद्रकांत गोडसे, धनंजय राऊत, दीपक गोडसे, भरत घनवट, शशिकांत पाटोळे, राजेंद्र चव्हाण, प्रतापराव देशमुख, दशरथ गोडसे, कृष्णराव बनसोडे, नंदकुमार पवार, शेखर म्हामणे, अक्षय थोरवे, अजित देशमुख, शंकर फडतरे, ज्ञानदेव काळे, सर्जेराव गोडसे, अंकुश जाधव, महेश गोडसे, ज्ञानेश्वर पंडित, नारायण माने, मोहन जाधव, महादेव गोडसे, विजय शेटे, श्रीकांत म्हामणे, विजय येवले, छगन पाटोळे, नितेश जाधव, तानाजी पवार, हणमंत पंडित, रणजीत जाधव, नंदकुमार इंगळे उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, सहकारी संस्थेने स्वमालकीची इमारत असणे संचालक मंडळ व सभासदांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना शेतीच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. राज्यात तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेवून काम करावे लागते.
प्रा. बंडा गोडसे यांनी सोसायटीच्या वाटचालीची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष एम. एस. गोडसे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव श्रीकृष्ण गोडसे, सहसचिव शत्रुघ्न काटकर, संतोष जानकर, हणमंत हांडे यांनी स्वागत केले. शरद पाटील यांनी आभार मानले.