मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात विचित्र अपघात झाला आहे. तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक दोन नाही तर तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंहीर जखमी झाले आहेत.
अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.