सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव आक्रमक
सिल्लोड – ओबीसीच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल व मनोज जरांगे पाटील यांचेबद्दल बेताल वक्तव्य करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन सिल्लोड तालुक्यातील मोढा येथील मराठा समन्वयकांनी जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात दिले.
दोन दिवसांपूर्वी अंबड येथे झालेल्या ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात राज्याचे जबाबदार मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी जाती-जातीत भांडणे भांडणे लागतील असे वक्तव्य केल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शनिवारी सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील सकल मराठा समाज बांधव अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले.
त्यांनी या संबंधित तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात दिला असून या तक्रार अर्जावर मोढा येथील दीपक हावळे, सांडू महाकाळ, गणेश ढोरमारे,श्रीनिवास महाकाळ, बाळू शिंदे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.