सुवर्णगाथा प्रतिष्ठानतर्फे लोणंदला “स्वरदीपावली’ मैफिल
लोणंद – गोरगरिबांची दीपावली गोड करून, लोणंदकरांना सुंदर मराठी गाण्यांच्या मैफिलीचा लाभ देणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नितीन सावंत यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
दीपावलीनिमित्त सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी आयोजित केलेल्या “स्वर दीपावली’ या गाण्यांचा कार्यक्रमात खासदार पाटील पाटील बोलत होते. राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सपोनि सुशील भोसले, उत्तमराव सावंत, नगरसेविका तृप्ती घाडगे, दीपाली निलेश शेळके, संदीप शेळके, शामसुंदर डोईफोडे, नीलेश शेळके, रमेश कर्णवर, लक्ष्मणराव शेळके, राहुल घाडगे, बाळासाहेब शेळके, अजित यादव, शैलजा खरात, राजू कुरेशी, डॉ. दीपक पवार, डॉ. दिलीप येळे, भावेश दोशी, मस्कूअण्णा शेळके, डॉ. मिलिंद काकडे, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. गणेश दाणी, सुनील यादव, दशरथ जाधव, दिनकर राऊत, विठ्ठल शेळके, डॉ. सागर महानवर, डॉ. मनोज निकम, बापूराव क्षीरसागर उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, दीपावलीसारख्या सणांच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांना डॉ. नितीन सावंत हे मदतीचा हात देत आहेत. एखाद्या फुलाची कळी उमलते. त्यानंतर सुंगध दरवळतो. त्याप्रमाणे डॉ. नितीन सावंत यांच्यासारखे नेतृत्व या भागात उभे करावे. कलाकारांनी गाण्यांचे अतिशय सुंदर सादरीकरण केले.
डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमीत मराठी भाषा ऐकून आपल्याला स्फुरण चढते. गाण्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लोणंद परिसरातील गरजू महिलांना भाऊबीजेची भेट दिल्याचे समाधान आहे. प्रारंभी खा. श्रीनिवास पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, नगरपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देण्यात आली.
संदीप शेळके यांची हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत करणाऱ्या नगरपंचायतीच्या कर्मचारी सुरेखा खरात यांचा खासदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपदा वाळवेकर आणि श्रीरंग जोशी यांनी मराठी गीतांची मैफिल रंगवली.
अभिजित कुलकर्णी यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. नितीन सावंत यांनी स्वागत केले. प्रा. रघुनाथ शेळके यांनी सूत्रसंचालन केले.