कराडमध्ये ७५ वर्षीय महिलेला करोनाची लागण; रुग्णसंख्या पोहचली १२४ वर
सातारा, (प्रतिनिधी) : कराड येथील करोनाबाधित रुग्णाची निकट सहवासातील ७५ वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री साडेदहा वाजता दिली.जिल्ह्यात आज दिवसभरातील हा पाचवा रुग्ण आहे. आता उपचार सुरु अ सलेल्या बाधितांची संख्या 87 झाली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२४झाली आहे.
खटावपाठोपाठ माण तालुक्यातही मंगळवारी रात्री उशिरा करोनाने शिरकाव केला. अहमदाबाद येथून मूळचा माण तालुक्यातील २५ वर्षीय युवकाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याचे रात्री सव्वानऊ वाजता सांगण्यात आले. जिल्ह्यात दिवसभरात पा जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १२४ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या खटाव व माण तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. तर कराड तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संहवासातील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत.
ठाण्यातून खरशिंगे (ता. खटाव) येथे दुचाकीवरून आईवडिलांना घेऊन आलेला 20 वर्षांचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात त्या युवकाला दाखल केले होते. करोनाबाधिताच्या निकट सहवासातील व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारा 29 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरूष व ७५ वर्षीय महिला अशा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यातील १२४ करोनाबाधितांपैकी आता ८७ रुग्ण उपचार घेत आहेत. ३५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबादवरून आलेला एक माण तालुक्यातील रहिवासी असलेला २५ वर्षीय तरुण संस्थात्मक विलगीकरणात होता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री उशिरा दिली.