कोरेगाव – २०१९ सालापासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने महायुतीला प्रत्येक निवडणुकीत भरभरून मते देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होणार असून चिमणगाव, ता. कोरेगाव येथे शनिवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य कोरेगाव मतदारसंघातून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कोरेगाव तालुक्यातील १२ गावातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चिमणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, भाजपचे कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव कर्पे, अर्जुन वीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नीलेश यादव, मोहन जाधव, नगरसेवक राहुल बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले व ना. महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात आला.
यावेळी अमोल सणस, रमेश माने, रामचंद्र शिंदे, शंकर जाधव, बाबा कदम, अमोल माने, दिलीप कदम, शंकर शिंदे, सतीश निकम, अजित भोसले, नाना वीर, शशिकांत वीर, अजित लवळे, नामदेव जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.