सातारा – येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूलने 125 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सन 2023-24 या वर्षात शाळा शतकोत्तर रौप्यमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करत आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांच्या संकल्पनेतून शालेय मुलांनी 125 अंकाची मानवी प्रतिकृती निर्माण करून एक तास वाचन केले.
यातून मुलांना वाचन प्रेरणा मिळण्यास मदत झाली. मुलांनी अधिकाधिक मराठी साहित्य वाचावे हा त्यामागील हेतू आहे. इ. 5 वी ते 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, सदस्य अनंत जोशी यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापिका सुजाता पाटील, विनया कुलकर्णी सौ.अंजली गोरे, राजेश सातपुते उपस्थित होते. कलाशिक्षक संदीप माळी व शिक्षकांनी मदत केली.