पुसेगाव – बुध बाजारपेठेतील श्री. महालक्ष्मी देवीचा रथोत्सव चांगभलच्या गजरात व गुलाल- खोबऱ्याच्या उधळणीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रथोत्सवाचे हे तेरावे वर्ष असून जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी देवदर्शनासह रथोत्सव सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.
रथोत्सवानिमित्त बाजारपेठेतील देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण रथमार्गावर भव्य आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. मंदिरात पहाटे काकड आरती करून देवीची षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. सनई चौघड्याच्या निनादात भरजरी वस्त्रांनी व फुलांनी पारंपारिक पध्दतीने देवीला सजविण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रियाताई शिंदे , सपोनि आशिष कांबळे, सरपंच सुजाता बोराटे, उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा खवळे , मनिषा चव्हाण, सुमेधा घाटगे, हरिदास जाधव, मायणी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनाथ फडतरे, सागर मदने, सरपंच वैभव आवळे, सरपंच संतोष गायकवाड, भगवान गायकवाड ,तेजस फाळके , उपसरपंच सयाजी फाळके , माजी सरपंच जयवंत गोसावी, धनाजी घाडगे , विनोद घाडगे , बबनराव पाटणकर , निखिल फडतरे , चंन्द्रकांत गिरी , शशिकांत घाटगे , राहुल कदम , विजय महामुलकर , सागर जाधव, सुकमार शेट्टी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत औंधचे मठाधिपती महंत शामपुरी महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले.
मंगलमय वातावरणात बँड पथक व ढोल-ताशांच्या गजरात रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीदरम्यान चौका-चौकात रथ थांबवून महिलांनी हळद-कुंकू वाहून देवीची खणा-नारळांनी ओटी ‘भरली. यावेळी अनेक भाविक रथावर नारळाची तोरणे व नोटांच्या माळा अर्पण करून नवस फेडतांना दिसत होते. ही मिरवणूक सोमनाथ आळीमार्गे बाजारपेठेतून पाच वाजता पुन्हा मंदिरात आली. यावेळी राजापूर, काटेवाडी, पांगरखेल, ललगुण, नागनाथवाडी, करंजओढा व बुध परिसरातील महिलांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. रथोत्सवाच्या यशस्वितेसाठी संजय जाधव, गजानन जगदाळे, कांतीलाल जाधव, शरद जाधव , चंद्रकांत चव्हाण , प्रमोद चव्हाण ,राजेंद्र जाधव, मुरली चव्हाण, बाळू जाधव, किरण चव्हाण, संतोष जाधव आदी कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.