पुसेगाव – बुध, ता. खटाव येथील श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यामंदिराचा विद्यार्थी विशाल दादासो पवार याने 19 वर्षाखाली वयोगटामध्ये चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात ब्रांझ पदक पटकावले. या यशाबद्दल विशाल पवार याचे तसेच संकेत ढवळे, दीपक पवार यांचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, विद्यालयाचा माजी संकेत ढवळे या विद्यार्थी याने राज्यस्तरीय स्पर्धेत भालाफेक प्रकारात सिल्व्हर पदक मिळवले तर दिपक पवार याने किक बॉक्सींग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून दोघांचीही राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
माजी सरपंच अभय राजेघाटगे, प्राचार्य अंकुश भांगरे, पर्यवेक्षक संजय कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी प्राचार्य शेखर घाटगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांस क्रीडा शिक्षक प्रा. दत्तात्रय काळुखे मार्गदर्शन मिळाले. यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. भगवान सरवदे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी आभार मानले.