सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 587 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 984 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 65, कराड उपजिल्हा रुग्णालय 24, फलटण उपजिल्हा रुग्णालय 85, कोरेगाव 74, वाई 81, खंडाळा 91, रायगाव 79, पानमळेवाडी 117, मायणी 46, महाबळेश्वर 60, पाटण 17, दहिवडी 53, खावली 5 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 187 अशा एकूण 984 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.