मुंबई – अभिनेत्री सारा अली खानने अभिनय क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांमुळे सारा नेहमीच चर्चेत राहिली आहे. साराने अनेकदा धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. याचे फोटोही ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. यानंतर आता साराने रविवारी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे. येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अजमेर शरीफ दर्ग्यात आल्यानंतर साराला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल व्हिडिओमध्ये सारा दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून प्रार्थना करताना दिसते. यावेळी साराने मिंट ग्रीन सलवार सूट घातला होता. तिने डोक्यावर दुपट्टा घातला होता आणि सनग्लासेस लावला होता. तिच्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी ती येथे प्रार्थना करण्यासाठी आल्याचे म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
सारा अनेकदा मंदिर आणि दर्ग्यांना भेट देताना दिसते. यावरून तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. दरम्यान, सारा अली खान विकी कौशलसोबत ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.