सातारा -तथाकथित डॉक्टर संतोष पोळ याने केलेल्या सहा खुनांची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून शनिवारी या खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची उलटतपासणी झाली. दरम्यान, पुढील सुनावणी 22 ऑक्टोंबरला होणार आहे. संतोष पोळ याने सहा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पोळची एकेकाळी सहकारी असलेली ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाली असून तिची गेल्या महिनाभरापासून उलट तपासणी सुरू आहे. ज्योती मांढरेचा उलट तपास संतोष पोळचे वकील श्रीकांत हुटगीकर घेत असून अजून एक महिना तरी उलट तपासाला लागतील, असे न्यायालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, शनिवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते. कळंबा कारागृहातून मुख्य संशयित संतोष पोळ यालाही सुनावणीवेळी जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते.