Sanskruti Balgude Debut In Bollywood| अभिनेत्री संस्कृती बालगुडे मराठी चित्रपटानंतर आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याआधी अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि प्रिया बापट या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींनी देखील बॉलीवूडमध्ये दमदार काम केले आहे. यानंतर आता संस्कृती देखील बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करण्यास सज्ज होणार आहे.
संस्कृती लवकरच बॉलिवूड अभिनेता शारिब हाश्मीसोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवूड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण संस्कृती लवकरच या नव्या प्रोजेक्टबाबत अधिकृत माहिती देणार आहे. संस्कृतीच्या आगामी बॉलीवूड चित्रपटासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
दरम्यान, अभिनयासह संस्कृती बालगुडेची नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री म्हणून ओळख आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक डान्सचे व्हिडिओ ती शेअर करते. Sanskruti Balgude Debut In Bollywood|
दरम्यान, संस्कृती बालगुडेने 2011मध्ये ‘पिंजरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. याशिवाय ती याआधी ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर ‘सांगतो ऐका’ निवडुंग, एफयु, शिव्या या चित्रपटातही संस्कृती झळकली होती. Sanskruti Balgude Debut In Bollywood|
हेही वाचा: