Election Commission of India| निवडणुक आयोगाने शनिवारी 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांच्या तारखांसह अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर केल्या.
तसेच या चारही राज्यांची मतमोजणी 4 जून रोजी होण्याचे जाहीर केले. मात्र निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या राज्यांच्या मतमोजणीच्या तारखेत बदल केला आहे. 4 जून ऐवजी 2 जूनला येथील मतमोजणी होणार आहे. मात्र यामागचे नेमकं कारण काय? ते पाहुयात.
काय आहे यामागचं कारण? Election Commission of India|
अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जूनला संपणार आहे. यामुळे मतमोजणी 2 जून पर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे. या कारणामुळे निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 जूनला या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. Election Commission of India|
Election Commission of India changes the counting schedule of Arunachal Pradesh and Sikkim from June 4 to June 2. pic.twitter.com/t53RwnCth5
— ANI (@ANI) March 17, 2024
अरुणाचल प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होईल, त्यानंतर उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 मार्च ही अंतिम तारीख आहे. Election Commission of India|
त्यानंतर 28 मार्चला उमेदवारी अर्ज पडताळणी होईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. मात्र या दोन विधानसभांच्या मतदान कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. येथे आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान पार पडणार आहे.
हेही वाचा :
चार महिन्यांपूर्वीच भाजप सोडणाऱ्या काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला अटक ; पत्नीवरही गुन्हा दाखल