मराठमोठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने 2011मध्ये “पिंजरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सांगतो ऐका, शॉर्टकट, निवडूंग, फ्रेंडशिप अनलिमिटेड, टेक केअर गुड नाईट, भय, “सर्व लाईन व्यस्त आहेत’
View this post on Instagram
अशा चित्रपटांमध्येही संस्कृती झळकली. पण “सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात साकारलेल्या अभिनयामुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.
View this post on Instagram
इतर सेलिब्रेटींप्रमाणे संस्कृतीदेखील इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या एका सेशनमध्ये एका चाहत्याने तिला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा तिने अगदी मजेशीर अंदाजामध्ये उत्तर दिले होते.
View this post on Instagram
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक साडीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. सॉफ्ट रॉ सिल्कच्या निळ्या रंगातील साडीमधील एकदम हटके लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.
View this post on Instagram
साधा अंबाडा, दागिन्यांमध्ये मोठे डिझायनर कानातले इतक्या जेमतेम मेकअपमध्ये देखील तीच सौंदर्य खुलून आले आहे. या फोटोला तिने कॅप्शनदेखील दिले आहे. फर्क इतना है, सबको लगती ‘मुस्कान’ है… सिर्फ वो वाकिफ है, ये ‘शर्माना’ है.. – संस्कृती
View this post on Instagram
तिने दिलेल्या या कॅप्शनमुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या बॉयफ्रेंडविषयी नक्कीच उत्सुकता वाढली असणार यात काही शंकाच नाही. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास “8 डॉन 75′ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.