पुणे – करोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेला भवानी पेठ आज करोनामुक्त झाला आहे. शहरात सोमवारी 187 नवे करोना बाधित आढळले असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एकही नविन बाधित रुग्ण आढळलेला नाही तर बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीतही अवघे 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक वेगाने पसरलेल्या करोनाच्या भयावह लाटेनंतर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात एकही नवा रुग्ण न सापडल्याने दिलासादायक बातमी आली आहे.
तर ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय, कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड- बावधन, कसबा – विश्रामबागवाडा, वानवडी- रामटेकडी आणि शिवाजी नगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 10 पेक्षाही कमी नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.