मुंबई – बायकांच्या पदराआडून खेळी करणं भाजपने थांबवावे, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
भाजपाच्या नेत्यांची संपत्ती 1600 पटींनी कशी वाढली त्याची चौकशी करणार का? आधी त्यांची चौकशी करा मग माझी 10 वर्षापुर्वी घेतलेल्या कर्जाची चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी इडीला दिले.
जर चुकीचे काही केले नसेल तर घाबरायचे कारण नाही असे ऐतिहासिक विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. आम्ही कोणालाही घाबरत नाही. तुमच्या भविष्याची आम्हाला गरज नाही.
आमच्यापैकी कोणीही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज आम्हाला नाही. पण, यापुढे तुम्हाला घाबरावे लागेल. आमच्या महिला आणि मुलांवर हल्ले करण्याची नामर्दांनगी कोणी करणार असेल तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ. आम्ही कोणत्याही थराला जाऊ, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्यांचे इडीत हेलपाटे –
भाजपाचे तीन नेते इडीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घलत आहेत. खरं तर तेथे बाहेरच्या वयक्तींना प्रवेश मिळत नाही. मात्र, तेथून कागदपत्रे बाहेर घेऊन जात आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासा मग कळेल ते नेते कोण होते. माझी चौकशी कर्जाच्या प्रकरणाशी संबंधित हे भाजपच्या नेत्यांना कोणी सांगितले, असा सवालही त्यांनी केला.