पुणे – रजपूत क्रिकेट अकादमीतर्फे संजय रजपूत स्मृती क्रिकेट स्पर्धेचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे. अकादमीचे मुख्य आधारस्तंभ संजय रजपूत यांच्या स्मरणार्थ होत असलेल्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती अकादमीचे अजय रजपूत यांनी दिली आहे. स्पर्धेच्या आयोजनाचे काम हर्षल रजपूत व अश्विन परदेशी पाहात आहेत.
पुणे क्रिकेट अकादमी, परब क्रिकेट अकादमी, रेडियन्ट क्रिकेट अकादमी, रजपूत क्रिकेट अकादमी, सेंच्युरी क्रिकेट अकादमी, वाव क्रिकेट अकादमी, श्री गणेश क्रिकेट अकादमी व ब्रिलियन्ट क्रिकेट अकादमी असे आठ संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.
रजपूत क्रिकेट अकादमी गेली 23 वर्षे आधी नेहरू स्टेडियम तर आता बिबवेवाडीतील अनिकेत सोसायटी येथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे.
नवोदित व गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील सामने स्वारगेट येथील नेहरू स्टेडियम व येवलेवाडीतील ब्रिलियन्ट क्रिकेट मैदानावर होणार आहेत.