मुंबई – अभिनेता संजय दत्त चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. आता स्वतः याबाबत संजय दत्तने खुलासा केला आहे. संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात झाल्याचे वृत्त समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर संजू बाबासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली होती. ताशा आशयाच्या अनेक पोस्ट देखील सोशल मीडियावर समोर आल्या होत्या.
केडी द डेव्हिल’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा सर्वांचा लाडका संजू बाबा शूटिंगदरम्यान जखमी झाला. बेंगळुरूच्या जवळच्या भागात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत असताना बॉम्बस्फोटाचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान मोठा स्फोट झाला आणि संजू बाबा जखमी झाला अशा आशयाचे मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता संजय दत्तने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
संजू बाबाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो,”मी जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. मी सर्वांना सांगू इच्छितो की ते पूर्णपणे निराधार आहेत. देवाच्या कृपेने मी बरा आणि निरोगी आहे. मी केडी या चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि संपूर्ण टीम माझी काळजी घेत आहे.तुम्ही माझी चिंता केल्याबद्दल धन्यवाद.
There are reports of me getting injured. I want to reassure everyone that they are completely baseless. By God’s grace, I am fine & healthy. I am shooting for the film KD & the team’s been extra careful while filming my scenes. Thank you everyone for reaching out & your concern.
— Sanjay Dutt (@duttsanjay) April 12, 2023
संजय दत्त सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. ‘KGF Chapter 2’ मध्ये ‘अधीरा’ बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील ‘Thalapathy 67’ आणि कन्नडमधील ‘KD the Devil’ मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूसर्वीच ‘केडी द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचा हिंदीत टीझर प्रदर्शित झाला होता. अशात संजू बाबाच्या अपघाताची आलेली बातमी त्याने फेटाळून लावत पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले आहे.