मुंबई – मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी आठवली की प्रेक्षक आजही खूप आनंदी होतात. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांमध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. आता पुन्हा एकदा सर्किट आणि मुन्नाभाईची जोडी लवकरच पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकतच अभिनेता अर्शद वारसीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, तो लवकरच संजय दत्तसोबत कमबॅक करत आहे.यापूर्वी दोघांनी साकारलेले सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ओरिजनल आणि नवीन काहीतरी कॉमेडी करण्यासाठी ही जोडी प्रसिद्ध आहे.या नव्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोघेही अभिनेते जेलमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
अर्शद वारसीने त्याच्या ट्विटर हॅंडलवर ट्विट केले आणि लिहिले – मी माझा भाऊ संजय दत्तसोबत आणखी एक सुपर एंटरटेनिंग चित्रपट घेऊन येत आहे. या पोस्टसह, त्याने सिद्धांत सचदेव, गौरव दुबे आणि थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्सला देखील टॅग केले आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाचे नाव सांगितले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेव करत असून हा चित्रपट यावर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Teaming up with my brother @duttsanjay for another super entertaining movie. Trust me our wait has been longer than yours
@threedimensionmotionpictures @dubey___gaurav @sidhaantsachdev5 #3DimensionMotionPictures #MovieAnnouncement #UpcomingMovie #WaitForIt pic.twitter.com/zZWcERdlSj
— Arshad Warsi (@ArshadWarsi) January 26, 2023
पुन्हा एकदा अर्शद वारसी आणि संजय दत्तची जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मिडीआयवर या चित्रपटाच्या पोस्टरचे जोरदार स्वागत केले आहे. बऱ्याच दिवसांनी चांगला कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकही चांगलेच उत्सुक असल्याचे त्यांच्या कमनेट्सवरून समजते.