माकडांनी पळवले करोनाचे नमुने; स्थानिक धास्तावले

मेरठ: माकडांनी लॅब टेक्‍नीशीयनवर हल्ला करून त्याच्याकडील करोना चाचणसिाठी घेतलेले नमुने माकडांनी पळवल्याने खळबळ उडाली आहे. यता संशयितांचे पुन्हा नव्याने नमुने घेतले असले तरी या माकडांकडील नमुन्यात एका बाधित असल्यास त्याचा परिणाम काय होईल, याबाबत स्थानिक धास्तावले आहेत.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मेडिकल कॉलेजच्या आवारात या लॅब टेक्‍निशियनवर हल्ला करण्यात आला. या कॉलेजमध्ये करोनाच्या तीन संशयित बाधितांचे नमुने घेण्यात आले होते. पण त्याची चाचणी होण्याआधीच माकडांनी लॅब टेक्‍नीशीयनवर हल्ला करुन हे नमुने पळवले. डॉक्‍टरांनी यानंतर संबंधित संशयितांचे नव्याने नमुने घेतले आहेत.

माकड करोना चाचणी किटमधील वस्तू चावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली. मात्र, असा कोणताही व्हिडिओ प्रशासनाकडे आलेला नाही. या घटनेची चौकशी करू,असे जिल्हाधिकारी अनिल डिंगरा यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.