लोणावळ्यातीळ खंडाळा विभागात ‘करोना पॉझिटिव्ह’

करोनाग्रस्त व्यक्‍तीच्या संपर्कातील महिलेलाही करोनाची लागण


अन्य आठ व्यक्तींची करोना चाचणी “निगेटिव्ह’

लोणावळा – लोणावळा शहरातील खंडाळा विभागात बुधवारी (दि. 27) आढळून आलेल्या करोनाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात असलेल्या एकूण नऊ व्यक्तींचे नमुने करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका 32 वर्षीय महिलेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने लोणावळा शहरातील करोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

लोणावळा शहर या रोगापासून दूर राहिले होते. मात्र बुधवारी लोणावळा शहरातील खंडाळा विभागात एक 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला करोना संसर्ग आढळून आला. नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्‍ती ज्या ठिकाणी राहायला होता, त्याठिकाणी कंटेन्मेंट आणि बफर झोन जाहीर करून संसर्गित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या एकूण 9 जणांना करोना तपासणीसाठी तळेगाव येथील होर्टिकल्चर सेंटर येथे पाठविण्यात आले आहे, तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण 73 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील 30 जणांना होम क्वारंटाईन, तर 43 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

खंडाळा विभागात संसर्ग झालेल्या पहिल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात असलेल्या त्याच्या कुटुंबातील त्यांच्या सुनबाईची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दुसरा रुग्ण हा पहिल्या रुग्णाच्या घरातीलच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.