घोडगंगाच्या संभाजी पाटील यांचे निधन

न्हावरे-न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी वसंतराव पाटील यांचे करोनावर उपचार घेत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने गुरुवारी सकाळी(दि.२४)सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना कारखान्याच्या जडणघडणीत पाटील यांचे विशेष योगदान आहे. कार्यकारी संचालक म्हणून कारखान्याच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर संभाजी पाटील यांचे कारखान्याच्या विकासात एकूणच योगदान पाहता संचालक मंडळाच्या शिफारशीवरून सध्या पाटील हे कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी शोक व्यक्त करताना एक अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी गमावला असल्याची भावना व्यक्त केली.तसेच यावेळी उपस्थित संचालक मंडळाने पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पाटील यांच्यावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल कराड(सातारा)येथे उपचार सुरू होते.
संभाजी पाटील यांचे कारखान्याचे सभासद, संचालक व कर्मचारी यांच्याशी कायमच स्नेहाचे व आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.संभाजी पाटील यांच्यावर पाचवड फाटा(कराड)येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.