मुंबई – सिद्धार्थ शिंदे नावाचा मुलगा कोरोनाबाधित आहे, तो कसा परीक्षा देणार? तसेच परीक्षेला बसणारी दोन लाख मुलं कोरोनाबाधित झाली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा होऊ देणार नाही. ही परिक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला आहे.
MPSC ची परीक्षा घेण्यासाठी सरकार एवढी घाई का करत आहे? यामागे काही षडयंत्र आहे का कळत नाही असे संभाजी राजे म्हणाले.
तसेच ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांची वयाची अट शिथिल
करून मर्यादा वाढवून सर्वांना सोबत घेऊन चला अशी माझी सरकारला सूचना आहे असेही संभाजी राजेेंनी म्हटले आहे.
राज्य सरकारने जर ऐकले नाही तर मराठा समाज MPSC चं केंद्र बंद करेल. मराठा समाजातील वकिलांनी काय करायला पाहिजे हे ठरवायला हवं. तसेच आंदोलनाची दिशा ठरवावी. असेही संभाजी राजे म्हणाले.
आत्तापर्यंत अनेकांचे खूप नुकसान झाले आहे. मराठा समाज आता अधिक आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाज आता महाराष्ट्र बंद करणार नाही मात्र, MPSC चं केंद्र नक्कीच बंद करू असा इशाराही संभाजी राजेंनी दिला.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने फसवले असल्याचा आरोपही संभाजी राजेंनी केला आहे.