मुंबई – अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू नुकतीच आजारातून बरी झाली असून सध्या ती मुंबईत तिच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलचे शूटिंग करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने पुष्पा-2 ची ऑफर नाकारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा 2’ या चित्रपटातील आयटम साँगची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. अभिनेत्रीने पुष्पा 2 ची ऑफर का नाकारली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘यू अंतवा’ या तिच्या आयटम साँगची खूप चर्चा झाली होती आणि ते आतापर्यंतच्या सर्वाधिक हिट गाण्यांपैकी एक आहे.
असे सांगण्यात आले आहे की समंथा पुष्पा-2 मध्ये 3 मिनिटांचे गाणे करणार होती. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी समंथाला तब्बल 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती पण समंथाने ती नाकारली. कारण तिला करिअरच्या या टप्प्यावर विशेष आयटम साँग करायचं नाहीये. दरम्यान, दिग्दर्शक सुकुमार समंथाला चित्रपटाचा एक भाग म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
समंथा रुथ प्रभूच्या कथित नकारामुळे टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली आहे की अभिनेत्री तेलगू फिल्म इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करत आहे. अभिनेत्रीची सिटाडेल ही वेब सिरीज हिंदीत रिलीज होणार आहे. सामंथाने विजय देवरकोंडाच्या खुशी या चित्रपटाचे शूटिंग स्थगित केल्याचे वृत्त आहे. आता या अभिनेत्रीनेही पुष्पा २ ची ऑफर नाकारून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.