दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य या दोघांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना जोरदार धक्का दिला. तेव्हापासून अभिनेत्री समंथा चांगलीच तर्चेत दिसून येत आहे. अलीकडेच समंथाने नागाला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. त्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘कधी कधी ताकद ही तुमच्या आतली इतकी मोठी आग नसते की, प्रत्येकजण ती पाहू शकेल.. कधी कधी ती एक छोटीशी ठिणगीही पुरेशी असते, जी अगदी शांतपणे म्हणते पुढे जा, तुम्हाला जे हवं ते मिळवा.’ अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
दरम्यान, समंथाने तिचा नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, पण तरीही तो मात्र तिला फॉलो करत आहे. याशिवाय अभिनेत्री नागाचा भाऊ अखिल अक्किनेनीला फॉलो करत आहे. समंथाने याआधीच तिच्या प्रोफाईलमधून नागासोबतचे सर्व फोटो हटवले होते.