मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण? असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर असून, चित्रपटात दौलतच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता “आदिनाथ कोठारे’ दिसणार असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
View this post on Instagram
मात्र, चित्रपटातील नृत्यागणा म्हणजेच, चंद्रमुखी कोण असणारा हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांबाबत गुप्तता बाळगून असलेल्या प्रसाद ओकने आता हळूहळू कलाकारांचे चेहरे रिलीज करण्यात सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ दिसत असून चंद्राची भूमिका अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ निभावणार असल्याचे दिसून येत आहे. काल याची अधिकृत घोषणा करण्यात असून, स्वतः अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा चंद्रमुखीतील लुक शेअर केला आहे.