तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र भारताचे प्रथम कृषी मंत्री स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, विद्युत अभियंता श्रुती ठाकरे, आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण, लिपिक भास्कर वाघमारे, रोहित भोसले, अर्चना काळे, समन्वयक विभा वाणी, करसंकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, विलास वाघमारे, प्रवीण शिंदे, शिपाई चंद्रशेखर खंते, चालक लक्ष्मण पवळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पांजली समर्पित करून अभिवादन केले.