Salman Khan New Film| बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खानने आज ईदीच्या दिवशी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमानचा चित्रपट रिलीज होतो. मात्र यंदा त्याचा कोणताही चित्रपट रिलीज न झाल्याने चाहते नाराजी व्यक्त करत होते. मात्र यातच त्याने आपल्या नव्या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे.
सलमानच्या नव्या चित्रपटाचे ‘सिंकदर’ असे नाव आहे. चाहत्यांना मनोरंजनाची ईदी देताना सलमानने खास ट्वीट केले आहे. यंदाची ईद ही ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ सोबत साजरी करा आणि पुढील वर्षीची ईद ही ‘सिंकदर’सोबत साजरी करा, असे सलमान खानने ट्वीटमध्ये सांगितले आहे.
Iss Eid ‘Bade Miyan Chote Miyan’ aur ‘Maidaan’ ko dekho aur agli Eid Sikandar se aa kar milo…. Wish u all Eid Mubarak!#SajidNadiadwala Presents #Sikandar
Directed by @ARMurugadoss @NGEMovies @WardaNadiadwala #SikandarEid2025 pic.twitter.com/5NIYdjPP9P— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 11, 2024
या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत असून ए. आर. मुरुगद्दोस हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, साजिद नाडियालवाल निर्माते असणार आहेत. निर्माता साजिद नाडियादवाला आणि सलमान खान यांनी सिकंदर या चित्रपटापूर्वीही एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीने जुडवा, मुझसे शादी करोगी, किक आणि इतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. किक चित्रपटानंतर प्रेक्षक दोघेही पुन्हा एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत होते, मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. Salman Khan New Film|
दरम्यान, सलमानला बऱ्याच दिवसांपासून सुपरहिट चित्रपट मिळालेला नाही. सलमानचा शेवटचा रिलीज झालेला टायगर 3 होता. याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सिकंदर व्यतिरिक्त तो किक 2, पठाण वर्सेज टायगरमध्ये दिसणार आहे. Salman Khan New Film|
हेही वाचा:
काँग्रेसवर नाराजीनंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या,’जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे’