मुंबई – सध्या बिग बॉस या शोची चांगलीच चर्चा आहे. हिंदी असो वा रिजनल भाषांमधील बिग बॉस सर्वांनाच प्रेक्षक भभरून प्रतिसाद देतात. बॉलिवूडच्या दबंग खानला सध्या डेंग्यूची लागण झाल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे. एका इंग्रजी मीडियाहाऊसने सलमान खानला डेंग्यू झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. तसेच सलमानने आपले सर्व शूटिंग शेड्युल देखील रद्द केल्याचे समजते. यामुळे आता बिग बॉस या बहुचर्चित शोच होस्टिंग कोण करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हिंदी बिग बॉस हा सर्वाधिक टीआरपी असणारा शो आहे. सलमान खानने या शोचे अनेक सिझन देखील यशस्वीपणे होस्ट केले आहेत. परंतु यंदाच्या सिझनदरम्यान सलमानला डेंग्यू झाल्याचे समोर येताच आता सलमान हा शो होस्ट करणार कि नाही असा सवाल अनेकांना पडला आहे. अशात शुक्रवारी होणाऱ्या बिग बॉसमध्ये कारण जोहरची एंट्री होणार असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेटकऱ्यांनी तर बिग बॉस हा शो आता पुढे करण जोहरच होस्ट करणार असल्याचं सोशल मीडियावर सांगायला सुरुवात केली आहे. या शोच्या निर्मात्यांकडून मात्र अद्याप सलमानच्या रिप्लेसमेंटबाबत किंवा प्रकृतीबाबत कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे टीव्ही प्रेक्षकांसह सलमान खानचे चाहते देखील बुचकळ्यात पडले आहेत. करणाने या आधी देखील ओटीटीवरील बिग बॉस होस्ट केला आहे. शिवाय आज करण बिग बॉसमध्ये हजेरी लावणार असल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्च्यांना उधाण आले आहे.