शिरूर -वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे विनापरवाना पेट्रोलची विक्री करणाऱ्या व विक्री करण्यासाठी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपचालकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संजय शिवाजी देशमुख (रा. वडगाव रासाई, ता. शिरूर), पेट्रोलपंप चालक रवींद्र लोखंडे व गणेश वाघ (दोघे रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर) या तिघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना (दि. 10) घडली आहे.
वडगाव रासाई येथे संजय देशमुख चोरून पेट्रोलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली नायब तहसीलदार डी. के. यादव व पुरवठा निरीक्षक शहाजी राखुंडे यांना माहिती. त्यानंतर यादव, राखुंडे, कामगार तलाठी कोळपे, ग्रामसेवक रासकर, पोलीस कॉन्स्टेबल गुंड यांच्या पथकाने संजय देशमुख राहत असलेल्या घरी छापा टाकला. संजय देशमुख हा शंभर रुपये लिटर दराने पेट्रोल विक्री करीत असल्याचे आढळला.
त्याच्या घरी एका निळा 40 लिटरच्या कॅनमध्ये 15 लिटर पेट्रोल, 5 लिटरचा कॅन, प्लॅस्टिकचे नरसाळे व मापासाठी प्लॅस्टिकचा जार, असा एकूण एक लाख पाच हजारांचा माल जप्त केला आहे. यावेळेस आरोपी संजय देशमुख यांच्याकडून कसून चौकशी केली. हे पेट्रोल त्याने रांजणगाव सांडस येथील रवींद्र लोखंडे यांच्या पेट्रोल पंपावरून आणले असल्याचे त्याने सांगितले.