बारामती- “देवा अजितदादांना लवकर बरे कर, अशी प्रार्थना करीत बारामती येथील मंगेश नाना ओमासे मित्र परिवाराने तिरुपती बालाजीला साकडे घातले आहे.
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार यांना करोनाचा संसर्ग झाल्याची वार्ता राज्यभर पसरली. स्वत: अजित पवार यांच्यावर दक्षता घेत आहेत. 15 तास कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गोतावळ्यात राहणाऱ्या अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले. यावेळी एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य मंगेश ओमासे व त्यांचा मित्रपरिवार तिरुपती येथे दाखल झाला. “देवा अजितदादांना लवकर करोनातून मुक्त कर’, अशी प्रार्थना करीत बालाजीचरणी लीन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत विजय गोंडे, प्रतीक जगताप व श्रीकांत चव्हाण आदींनी प्रार्थना केली.