Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या या शोचे 17 वे पर्व सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे वादविवाद नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. यातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांकडून पाठिंबा दिला जात आहे. यातच आता अभिषेक कुमारला अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे.
नुकतेच झालेल्या एपिसोडमध्ये समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय अभिषेकचे खच्चीकरण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ईशा आणि समर्थ अभिषेकशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडू लागतात. अभिषेकचे आयुष्य दयनीय करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ईशा आणि समर्थ अभिषेकशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडू लागतात. त्यानंतर रितेशनेही ट्वीट करत त्याला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुखने “अभिषेकसाठी खूप वाईट वाटत आहे”, असे ट्वीटमध्ये (एक्स) लिहिले आहे.
View this post on Instagram
आजकाल ईशा आणि समर्थ अभिषेकला खूप चिथावणी देत आहेत. अभिषेकच नाही तर ईशा आणि समर्थ यांनीही मुनावर फारुकीला देखील चिडवले होते. मात्र सततच्या ईशा आणि समर्थ यांच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. “ईशा आणि समर्थला कोणीच काही बोलत नाही. बिग बॉसने काहीतरी अॅक्शन घ्यायला हवी,” “अभिषेक तू खरचं खूप स्ट्रॉन्ग आहेस”अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.