मुंबई – अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या दिलखेच अदा, स्टाईल आणि हॉट अंदाजामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. विविध भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने इनस्टाग्रामवर तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहे. सईने सुंदर आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत ती कमालीची हॉट दिसत आहे. तिने अतिशय बोल्ड पोज देत सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवल्या आहेत. ‘समरिंग इन अ सारी’ म्हणत तिने तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या लुकवर सध्या चाहत्यांच्या लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सई नुकतीच‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती. 2 डिसेंबर 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे.