काठमांडू : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘खो-खो’ मध्ये भारतीय पुरूष संघापाठोपाठ महिला संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला संघाने खो-खोच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा १७-०५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
#TeamIndia Women's #KhoKho team put up a brilliant show to land another🥇into India's medal count at the 13th #SouthAsianGames, having defeated home team Nepal by 17-5! #Kudos Girls 👏 pic.twitter.com/nZTNXih2MA
— Team India (@WeAreTeamIndia) December 4, 2019
भारतीय महिला संघाकडून आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी ५-५ खेळाडूंना बाद करत भारताचा विजय सुकर केला. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बांगलागेशने श्रीलंकेचा १०-७ असा ०१ डाव राखून ३ गुणांनी पराभव केला.
दरम्यान, भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा २५-०१ असा ०१ डाव अन् २४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.